Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात धावत्या गॅस कंटेनरवर धडकल्याने दुचाकास्वार ठार

जळगाव प्रतिनिधी : राष्ट्रीय महामार्गावरील मुंबई-रेल्वे रेल्वे उड्डाणपुलावर गॅस कन्टेनरने ब्रेक देताच मागून भरधाव वेगाने येणाऱ्या मोटार सायकलस्वार धडकला. त्यात त्याला जोरात फटका बसल्याने जागीच ठार झाल्याची घटना आज शिवकॉलनी जवळ घडली. दरम्यान या घटनास्थळावरुन कंटनरचालक फरार होण्याच्या प्रयत्नात असतांना रामांनदनगर पोलीसात त्याला कंटेनरसह ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती अशी की, गॅसने भरलेला टँकर (क्र.एमएच ४८ एवाय ४६२९) जळगाव शहरातून पाळधीकडे जात असतांना कंन्टेनरच्या मागे दुचाकी क्रमांक (एमएच १९ यु ५१३० ) जात होती. सकाळी ११ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील मुंबई-रेल्वे रेल्वे उड्डाणपुलावरुन जात असतांना गॅस कन्टेनरने जोरदार ब्रेक मारल्याने मागून येणऱ्या दुचाकी थेट गॅस कंन्टेनरला धडक दिली. यात दुचाकीस्वार कैलास हेमराज पवार (वय-४०) रा.पाल. ह.मु. मढीचौक पिंप्राळा यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळाहून कन्टेनरचालकाने पळ काढण्याचा प्रयत्नात असतांना रामानंद नगर पोलीसांनी ताब्यात घेतले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा कन्टेनर चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे.

वाहतूक पोलिसांसह रामानंदनगर पोलिसांची धाव
शिव कॉलनी पुलावर अपघात झाल्याची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांसह रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़ अपघातामुळे महामार्गवर वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे पोलिसांनी वाहतूक सुरळीत करीत अपघातग्रस्त दुचाकी बाजूला केली तर मयत दुचाकीस्वाराला जिल्हा रूग्णालयात वाहनातून नेले. रामानंदनगर पोलीस ठाण्यातील रवी नरवाडे, रवींद्र पाटील, प्रवीण वाघ यांनी देखील घटनास्थळी येऊन पाहणी केली.

Exit mobile version