Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात देहविक्री करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

जळगाव प्रतिनिधी । एकीकडे कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असतांना अगदी बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी धाड टाकल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

गेल्या महिन्यात जळगावात हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा टाकण्यात आला होता. यात एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी महिलेचा समावेश असल्याने याची मोठी चर्चा रंगली होती. यावरून अनेक वाद देखील झाले होते. यानंतर आता शहरातील गंधर्व कॉलनी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून देहविक्री करणार्‍या महिलांसह आंबट शौकिनांना ताब्यात घेतले आहे. त्यांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच )

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version