Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात दुकानदाराला शिवीगाळ करणाऱ्या तरूणावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पोलनपेठ येथील अग्रवाल ट्रेडींग दुकानाच्या मालकाला शिवीगाळ व मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या तरूणावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जगदीश पुरनचंद अग्रवाल (वय-६०) रा. विसनजी नगर, जिल्हा पेठ यांचे पोलनपेठ येथे अग्रवाल ट्रेड एजन्सी नावाचे दुकान आहे. आज १९ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे दुकानावर आले. दुकानाच्या मागे कॉलम बांधण्यात आले आहे. हे बांधकाम अनिल हरीशंकर अग्रवाल हा दोन मजूर लावून बाहेर फेकत होता. याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण जगदीश अग्रवाल यांनी काढले. याचा राग येवून अनिल अग्रवाल याने शिवीगाळ केली. त्यानंतर ते दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले असता रस्त्यावर पाठलाग करून विसजनी नगरातील मारूती मंदीराजवळ दुचाकी अडवून अश्लिल शिवीगाळ केली. आणि खिश्यातील ३ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून मारहाण आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अनिल अग्रवाल याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस कर्मचारी करीत आहे. 

Exit mobile version