Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात तृतीयपंथीयावर प्राणघातक हल्ला करणारा अटकेत

जळगाव प्रतिनिधी । दारू पिऊन रिक्षाचालकाने तृतीयपंथीवर चाकू हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली होती. यातील संशयित आरोपी रिक्षाचालकास शहर पोलीसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तृतीयपंथी अर्चनाजान ह्या सहकारी राशीजान, कल्याणीजान व जमन्नाजान अश्या एकत्र शहरातील गोलाणी मार्केटच्या चौथ्या मजल्यावर राहतात. त्यांना बाहेर जायचे असल्यास ते रिक्षाचालक हेमंत नानकराम गुजर हा रिक्षात बसून बाहेर जातात. ३ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास चौघींना बाहेर जाण्यासाठी रिक्षाचालक हेमंत गुजर याला बोलावून घेतले. त्यावेळी रिक्षाचालक दारू पिऊन तर्रर्र झालेल्या अवस्थेत आला. यावेळी अर्चनाजाने दारू पिऊन का आला असे विचारले असता रिक्षाचालकाने शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली तर अर्चनाजानच्या छातीवर चाकून वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रिक्षाचालक विरोधात गुन्हा करण्यात आला होता. दरम्यान शनिवारी रात्री उशीरा रिक्षाचालकास शहर पोलीसांनी अटक केली. शहर पोलिस पुढील कारवाई करत आहे.

Exit mobile version