Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात ट्रकच्या धडकेतील वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । कामानिमित्त बाहेर पडलेल्या वृध्दाला ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना शनिवारी सकाळी घडली होती. उपचारादरम्यान सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे.

नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत भानूदास ढाके (वय-७९) रा. ट्रान्सपोर्ट नगर हे आपल्या पत्नीसह राहतात. शनिवार १४ जून रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास कामानिमित्त बाहेर पडले होते. राष्ट्रीय महामार्गावरील ट्रान्सपोर्टनगराजवळ संजय हॉटेलसमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. त्यांच्या हातावरून ट्रकचे चाक गेल्याने हात निकामी झाला होता. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, रस्त्याच्या एका बाजूला चारी खोदल्याने हा अपघात झाला आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. त्याच्या पश्चात पत्नी नंदीनी, डॉ. श्याम ढाके व चंद्रशेखर मुले असा परिवार आहे.

Exit mobile version