Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात टिपू सुलतान यांच्या जयंती व्याख्यानाचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्यसंग्रामाची ज्योत पेटविणारे शहीद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्ताने  सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन तर्फे “टिपु का पैगाम आखरी सांस वतन के नाम ” या कार्यक्रमाचे भिलपुरा चौकात आयोजन रविवार दि. २० नोव्हेंबर रोजी करण्यात आलेले होते.

 

“टिपु का पैगाम आखरी सांस वतन के नाम ” कार्यक्रमाचे उद्घाटन हाजी सै.युसूफ अली यांच्या शुभहस्ते करण्यात आले.   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी  शेख सलीमुद्दीन  हे होते.  याप्रसंगी मुख्य वक्ता म्हणून सै. अयाज अली नियाज अली यांनी  आपल्या मनोगतात टिपू सुलतान यांचे देशप्रेम, दिन दुबळे, गरीब, वंचित, आदिवासी तसेच त्यावेळेस स्त्री वर्गावर होणाऱ्या व लादल्या गेलेल्या  अन्यायकारक व अमानववीय जाचक अटी व नियम  विरुद्ध लढा उभारून स्त्री वर्गाचा मान सन्मान वाढवून त्यांना मुख्य मुख्य प्रवाहात आणण्यात  सिंहाचा वाटा होता. व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्र, शैक्षणिक  क्षेत्रात अतुलनिय अशी  कामगिरी केलेली होती. तसेच टिपू सुलतान यांच्या राज्यात सर्व धर्मीयांना समान हक्क, अधिकार बहाल करण्यात आलेले होते. ते गंगा जमुनी तहजीब( सर्वधर्मसमभाव, राष्ट्रीय एकात्मता) ला मानणारे होते, तसेच त्यांनी संपूर्ण जीवन देश व प्रजेसाठी अर्पित केलेले होते. सर्वप्रथम इंग्रजांचा आपल्या देश भारत व भारतीयांना असलेला धोका ओळखून त्यांच्याशी युद्ध केले. ते प्रथम स्वातंत्र्य सेनानी तसेच प्रथम देशासाठी शहीद होणारे राजा  होते. त्यांनी अनेक मशीद,  मंदिर,  तलाव, विहिरी तसेच अनेक समाज उपयोगी व राष्ट्रीय उपयोगी वास्तू उभारल्या. सर्वप्रथम रॉकेट टिपू सुलतान यांनी बनवला होता. त्यांना फक्त भारतीय नव्हे तर संपूर्ण जगात लोकं मानतात मानसन्मान देतात. असे सांगितले.

याप्रसंगी सै. युसूफ अली, सै. अयाज अली नियाज अली, रवींद्र  खैरनार, योगेश मराठे, सतीश वाणी, हाजी सय्यद जावेद, नाझीम पेंटर, हाजी अब्दुल रहेमान, सुरज गुप्ता, इलियास नुरी, शफी ठेकेदार,शेख जलालुद्दीन, सलमान मेहमूद, शेख आदिल,झिशान हुसैन,  ओवेश अली,शेख दानिश, हुसैन कादरी, अता – ए – मोईन अली, शेख नझीरउद्दीन, अर्शद असगर आदीसह  नागरिक उपस्थित होते.

 

Exit mobile version