जळगावात घरासमोर उभी असेलली दुचाकी चोरट्यांनी लांबवली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल एकवीरा येथून एकाची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज सतीश पाटील (वय 23) रा. अहुजा नगर हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. 7 सप्टेंबर रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची (एमएच 19 डीई 2359) क्रमांकाची दुचाकी घरासमोर लावली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी राज पाटील यांच्या फिर्यादीनुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल मोरे करीत आहे.

 

Protected Content