Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात गावठी पिस्टल घेवून फिरणाऱ्या तरूणाला अटक

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील रेल्वे स्थानक परिसरात गावठी पिस्टल आणि काडतूस घेवून फिरणाऱ्या तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या ॲक्सीस बँक एटीएम जवळील पानटपरीजवळील आडोश्याला संशयित आरोपी युनूस सलिम पटेल (वय-३०) रा. गेंदालाल मिल जळगाव, हा हातात गावठी कट्टा घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने कारवाई करत संशयित आरोपी युनूस पटेल याला शनिवारी १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता अटक केली. त्याच्याजवळील गावठी बनावटीचे पिस्टल व जीवंत काडतूस हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक नितीन प्रकाश बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संतोष खवले करीत आहे.

Exit mobile version