Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात केलेल्या घरफोडीतील अल्पवयीन गुन्हेगारास अटक

जळगाव प्रतिनिधी । घरफोडीतील अल्पवयीन अट्टल गुन्हेगार एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, एमआयडीसी पोस्टेला जबरी चोरीचे गुन्हे दाखल होते त्यातील चोरी करणारा हा अल्पवयीन होता त्याचा शोध घेत असतांना अशी माहिती मिळाली की, सदर अल्पवयीन हा सऱ्हाईत गुन्हेगार गोकुळ हंसराज राठोड, रा- सुप्रिम कॉलनी, ह.मु. उरण, ता.जि. ठाणे याचा मुलगा आहे व तो एमआयडीसी पोस्टेच्या घरफोडीच्या दोन गुन्ह्यात फरार होता व तो आज 23 फेब्रुवारी 2020 रोजी जळगावात माहिती पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांना मिळाल्यावर त्यांचे पथकातील सहा.फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, पोकॉ सचिन चौधरी, मुकेश पाटील, इम्रान सैय्यद, गोविंदा पाटील, मुद्दस्सर काझी, सतीष गर्जे, योगेश बारी, सचिन पाटील, असिम तडवी अशांनी गोकुळ हंसराज राठोड यास सुप्रिम कॉलनी येथुन त्याच्या शालकाच्या घरातुन ताब्यात घेतले.

त्याचा साथीदार नुरमोहम्मद अब्दूलरज्जाक शेख, रा-  पोलीस कॉलनी, सुप्रिम कॉलनी परिसर, जळगाव अशांनी  04 ऑक्टोबर 2017 रोजी रात्री स्वप्नील घनश्याम भाला, रा. उदय कॉलनी, गणेश कॉलनी परिसर, जळगाव यांचे एमआयडीसी परिसरातील गुरांचे बाजारासमोर सेक्टर जे 1, सुप्रभा दालमिल कंपनीतुन   शटरला असलेले कुलूप तोडून आत प्रवेश करुन 37,800/- रुपये किंमतीचे येलो स्टार ब्रँडचे 18 नग चनादाळ असलेले कट्टे प्रत्येकी वजन 30 किलो असे असलेले तपकीरी व सोनेरी रंगाचे कट्टे चोरी केले होते तसेच दि. 13/10/2017 रोजी रात्री मुकेश श्रीकृष्ण वाणी यांच्या मुकेश ऍ़ग्रो इंडस्ट्रिज, एमआयडीसी जळगाव येथील कंपनीतुन 30000/- रुपये किंमतीच्या बारदानच्या गोण्या चोरी केल्या होत्या. सदर बाबतीत अज्ञात इसमांविरुद्ध घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

15 ऑक्टोबर 2017 रोजी नुरमोहम्मद अब्दूल रज्जाक शेख यास अटक करण्यात आली होती. परंतु सदरचे गुन्हे घडल्यापासुन गोकुळ हंसराज राठोड हा मिळुन आला नव्हता तेव्हापासुन तो फरार होता. त्याच्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो आज रोजी जळगाव येथे आल्यावर त्यास ताब्यात घेण्यात आले असुन गोकुळ हंसराज राठोड यास अटक करण्यात आलेली आहे. सदर आरोपी हा तीन वर्षांपासुन फरार होता.

Exit mobile version