Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात किराणा दुकान फोडले; २५ हजाराचा मुद्देमाल लंपास

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मिल परीसरातील किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील २५ हजाराचा किराणा माल चोरून नेल्याचा प्रकार आज सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, संदिप गोरक ठाकरे (वय-२८) रा. गौतम अपार्टमेंट, गुजराल पेट्रोल पंप, जळगाव यांचे गेंदालाल मिल, मनपा कॉम्प्लेक्स येथे संदिप ट्रेडींग नावाचे किराणा दुकान आहे. २७ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास दुकान बंद केले. आज सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास दुकानाच्या मागे राहणारे मित्र विनोद सावळे यांनी फोन करून सांगितले की, तुझ्या दुकानाचे शटर एका बाजून उचकवलेले दिसून आले असल्याचे सांगितले. त्यानुसार दुकानावर जावून बघितले तर अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर डाव्या बाजूने वाकवुन दुकाना २५ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला आहे. यात चहापत्ती, साखर, तेल, साबन, खोबरेल तेल, तेलाच्या बाटल्या, मिरचीच्या पुड्या, शेंगदाणे, कोलगेट, गव्हाचे पिठ आदी वस्तू चोरून नेल्याचे समोर आले. याप्रकरणी संदीप ठाकरे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version