Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात कर सल्लागार व सनदी लेखापाल यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । केंद्र शासनाने टॅक्स ऑडिटसह इतर बाबींसाठी मुदत वाढ द्यावी यासाठी जिल्ह्यातील कर सल्लागार व सनदी लेखापाल यांनी आज सकाळी ११ वाजता काळ्या फिती बांधून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात अनेकांना मोठा फटका बसला आहे. यात छोटे व मोठे व्यावसायिकांना यांचा समावेश आहे. करदाते व कर व्यवसायिकांचे सर्वांचे दुकान बंद होते. सप्टेंबर २०२० पर्यंत कामकाज बंद असल्यामुळे व्यावसायिकांना रिटर्न भरलेला नाही. आज सर्व क्षेत्रांतील कामांचे मुदत वाढ देण्यात येत आहे. मात्र कोरोनाच्या माहामारीत शासनाने करदात्यांना टॅक्स रिटर्न भरण्यासाठी मुदत वाढ न करता दंड व लेट फि आकरण्यात मग्न आहे. शासनाने असे न करता टॅक्स रिटर्न भरण्यासाठी मुदत वाढ द्यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्ह्यातील कर सल्लागार व सनदी लेखापाल यांची उपस्थिती होती. यात सीए विरेंद्र कावडीया, प्रविण अचलिया, शिरीष सिसोदीया, जयेश ललवाणी, साहेबराव पाटील, सौरभ लोढा, विकी बिरला, प्रशांत शिंदे, दिनार दप्तरी यांच्या आदी सनदी लेखापाल उपस्थित होते.

 

 

 

Exit mobile version