Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात एक दिवस उशीराने होणार पाणीपुरवठा

जळगाव प्रतिनिधी । शहरात झालेल्या पाऊस व वादळात आणि दोन दिवस होणाऱ्या चक्रीवादळामुळे विद्यूत प्रवाह खंडीत होण्याची शक्यता असल्याने नियमित होणारा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती जळगाव महापालिकेच्या शहर अभियंता यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

२ जुन व ३ रोजी झालेल्या पाऊस आणि वादळामुळे जळगाव शहरास पाणीपुरवठा करणारी वाघुर वॉटर पंपींग येथील ५०० एचपी पंपाचा विद्यूत पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे उमाळा जलशुध्दीकरण केंद्र येथील पाणी साठवण टाकीत पुर्ण क्षमतेचे पाणी भरणा न झाल्यामुळे ३ जुन रोजी शहरातील होणारा पाणीपुरवठा होऊ शकला नाही. तसेच जळगाव जिल्ह्यात चक्रीवादळामुळे ३ व ४ जून रोजी सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याने ३ जून रोजी रात्री विद्यूत पुरवठा खंडीत होण्याची शक्यता आल्याने ३ जून रोजी ज्या भागात पाणीपुरवठा होणार होता तो आता ४ जून रोजी होणार आहे. त्याप्रमाणे ४ व ५ जून रोजीचा पुणीपुरवठा अनुक्रमे ५ व ६ जुन रोजी होणार आहे यांची नागरीकांनी नोंद घ्यावी अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

४ जून रोजी पाणीपुरवठा होणारा परिसर
जुने जळगाव, नटराज थियेटर, इंडिया गॅरेज, दंगलग्रस्त कॉलनी, ओंकार नगर, सिंधी कॉलनी, शाहू नगर, प्रताप नगर, रिंगरोडचा काही भाग, भोईटे नगरचा काही भाग, राधाकृष्ण नगर, कानळदा रोड, के.सी.पार्क, त्रिभुवन कॉलनी, गेंदालाल मीलचा काही परिसर, लाठी शाळा, ढाके वाडी, रंछोडदास नगर, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, नित्यानंद नगर टाकीवरील धामणवाडा, शिवमंदीर परिसर, धांडे नगर, स्टेट बँक कॉलनी, डी.एस.पी टाकीवरील सुरेश नगर काही भाग, पाटबंधारे कॉलनी, स्टेट बँक कॉलनी परिसर

Exit mobile version