Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात उद्यापासून ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन

जळगाव प्रतिनिधी । येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागच्या वतीने उद्यापासून भ्रष्टाचार आणि अधिकारांचा दुरूपयोगाविरोधात जनजागृती करण्यासाठी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.

२७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत भष्ट्राचार आणि अधिकारांचा दुरूपयोगाविरोधात जनजागृती करण्यात येत आहे. ३१ ऑक्टोबर रोजी शहरातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त या सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचारी आणि भ्रष्ट पध्दती नष्ट करण्यासाठी जागरूकता मोहित राबविण्याचा मुळ उद्देश आहे. नाशिक परिक्षेत्राचे ॲन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधिक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपअधिक्षक दिनकर पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली, दक्षता जनजागृती सप्ताह अंतर्गत भ्रष्टाचाराविरोधात जागरुकता आयोजीत करण्यात आली आहे.

जिल्हावासीयांनी आपले कोणतेही काम करून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची लाच देण्याची आवश्यकता नाही. भ्रष्टाचार विरोधी कायद्याची माहिती आणि सर्वसामान्य नागरीकाने जागरूक रहावे, तसेच भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. असे आवाहन नाशिक परिक्षेत्राचे ॲन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांनी केले आहे.

Exit mobile version