Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात आई मरिमाता बारागाड्या उत्सव (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सुमारे १५७ वर्षांची परंपरा असणार्‍या शहरातील मरिमातेच्या बारागाड्या आज भाविकांच्या उदंड जल्लोषात टाॅवर चौक येथून काढण्यात आल्या. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

 

सुमारे १५७ वर्षाची परंपरा असलेल्या मरिमातेच्या बारागाड्या मोठ्या उत्सहात ओढण्यात आल्या. यावेळी भगत संजूनाना मोरे यांची मरिमातेच्या ध्वजासह मिरवणूक काढण्यात आली. भगत मोरे यांनी प्रथम फुले मार्केटमधील मरिमातेच्या मंदिरात दर्शन घेतले. यानंतर बारागाड्यांची विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी भगत मोरे यांचे बगले किशोर मोरे, धनराज गायकवाड यांनी सेवा दिली. टाॅवर चौक येथून बारागाड्या ओढण्यासं प्रारंभ करण्यात येवून समारोप भिलपुरा चौकत करण्यात आला.  बारागाड्या ओढण्याचे नियोजन पोलीस पाटील प्रभाकर पाटील यांनी  नाना सोनवणे, जंगलू मोरे, बापू सोनवणे, अरुण मोरे, ईश्वर मोरे, धनराज गायकवाड, श्रावण कोळी, जगदीश अत्तरदे, युवराज पाटील, रमेश धनगर, रामकृष्ण धनगर, उत्तम चौधरी यांच्या सहकार्याने केले.

 

 

भाग १

भाग २

Exit mobile version