Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील एका भागात राहणारे १२ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसह राहते. रविवार २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास दुकानावर मटन घेऊन येते असे सांगून बारा वर्षे मुलगी घराबाहेर पडली. दुपारी उशिरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकाने त्याची शोधाशोध सुरू केली. दरम्यान सायंकाळी घरी न आल्याने मुलीच्या नातेवाइकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.

Exit mobile version