जळगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; शनीपेठ पोलीसात तरूणावर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी ।  शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी तरूणावर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शनीपेठ पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आई व कुटुंबियाला वास्तव्याला आहे. रविवारी २१ नोव्हेंबर रोजी रात्री अल्पवयीन मुलगी घरात असतांना संशयित आरोपी सागर युवराज गवळी रा. जळगाव हा तिच्या घरात घुसला. अल्पवयीन मुलीच्या आईची ओढणी ओढली. त्यावेळी अल्पयीन मुलगी सोडविण्यासाठी गेली असता सागर गवळी याने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केला. तसेच आई व मुलीला अश्लिल शिवीगाळ करून अत्याचार करण्याची धमकी दिली. याप्रकरणी सोमवारी २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पिडीत अल्पवयीन मुलगीने शनीपेठ पोलीसात तक्रार दिली. तक्रारीवरून संशयित आरोपी सागर गवळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहे.

Protected Content