Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । दहा मिनिटात येतो असे सांगून घराबाहेर पडलेल्या १४ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील पंढरपूर नगरात घडली आहे. याप्रकरणी शुक्रवार, १४ ऑक्टोंबर रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील पंढरपूर नगरात अल्पवयीन मुलगा त्याच्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. १३ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५ वाजता अल्पवयीन मुलाने घरात दहा मिनिटात येतो,, असे सांगून तो बाहेर पडला. त्यानंतर तो पुन्हा घरी परतला नाही. सर्वत्र शोध घेवून त्याची कुठेही माहिती अथवा तो प्रत्यक्षात मिळून आला नाही. काहीतरी आमिष दाखवून अज्ञान व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याचा संशय अल्पवयीन मुलाच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक निलेश गोसावी हे करीत आहेत.

Exit mobile version