Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातून बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह तलावात आढळला

जळगाव प्रतिनिधी । शहरातील नितीन साहित्या नगरातून बेपत्ता झालेल्या २० वर्षीय तरूणाचा मृतदेह आज गाडगे तलावात आढळून आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, अमोल अधिकार पाटील (वय-२०) रा. नितीन साहित्या नगर, जळगाव हा आपल्या आई चंद्रकला पाटील यांच्यासह राहतो. एमआयडीसीतील मोरया ग्लोबल कंपनीत कामाला आहे. २० जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरातून अमोल बेपत्ता झाला. आईने नातेवाईक व मित्रांकडे चौकशी केली असता तो मिळून आला नाही. आई चंद्रकला पाटील यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात २१ जुलै रोजी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. आज २२ जुलै रोजी सकाळी नितीन साहित्या नगरजवळ असलेल्या एका तलावात अमोलचा मृतदेह आढळून आला. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह बेपत्ता झालेल्या अमोलचाच असल्याचे ओळखले. दरम्यान दुपारपर्यंत मयत अमोलच्याआईशी संपर्क होवू शकला नाही. एमआयडीसी पोलीसांनी मृतदेह जिल्हा कोवीड रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

Exit mobile version