Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातील रुख्मिनी नगरात मध्यरात्री बंद घर फोडले

jalgaon chori news

जळगाव प्रतिनिधी । येथील रुख्मिनी नगर (हरिविठ्ठल रोड परिसर) भागातील बंद घराचा कडी कोंडा तोडून चोरी झाल्याची घटना मध्य रात्री घडली. वारंवार होणाऱ्‍या चोरीच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिस गस्तीची मागणी केली जात आहे.

याबाबत वृत्त असे की, रुख्मिनी नगर भागात एरंडोल पोलिस स्टेशनचे कर्मचारी धनंजय सोनवणे आपल्या परिवारासह राहतात.या परिवारातील सर्व सदस्य सध्या बड़ोदा येथे नातेवाइकांकडे गेले आहेत. त्यामुळे त्यांचे घर कुलुप बंद आहे. बंद घराचा फायदा घेवून चोरट्यानी त्यांच्या घरात हात साफ केला. सकाळी शेजारी राहणाऱ्‍या लोकांच्या लक्षात हा प्रकार आला. या घटनेची माहिती परगावी गेलेल्या पोलिस कर्मचारी धनंजय सोनवणे यांना देण्यात आली आहे.त्यामुळे ते जळगावला परत येण्यास निघाले आहे. ते परत आल्या नंतरच नेमकी किती चोरी झाली आहे याचा उलगडा होणार आहे. घरफोडी झाल्याचे रामानंद नगर पोलीसांना कळविण्यात आले असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.

Exit mobile version