Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातील रामनगरातून मोबाईल लांबविणाऱ्या चोरट्यास अटक

जळगाव प्रतिनिधी। मेहरूण परिसरातील रामनगरातून अज्ञात चोरट्या ने मोबाइल चोरून नेल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती. अवघ्या काही तासातच एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. अरबाज सलमान पटेल (वय-१९, रा.रामनगर) असे मोबाईल चोरट्याचे नाव आहे. त्याच्याजवळून मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, मेहरूण परिसरातील रामनगरात राहणाऱ्या अनिता प्रवीण पाटील यांच्या घरातून गुरूवारी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने ८ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला होता. याबाबत शनिवारी अनिता पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, मोबाईल चोरटा हा रामनगरातीलच असल्याची पोलिसांनी मिळाली. त्यानुसार रामकृष्ण पाटील, सतिश गर्जे, महेंद्र गायकवाड, सचिन पाटील, मुकेश पाटील यांनी रामनगर येथून अरबाज सलमान पटेल याला अटक करून त्याच्याजवळून मोबाईल हस्तगत केला आहे.

Exit mobile version