Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातील पांडे चौकात तरूणाला लोखंडी पट्टीने मारहाण

जळगाव प्रतिनिधी । मित्रासोबत बोलत असतांना अज्ञात व्यक्तीने लोखंडी पट्टीने केल्याने तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, सागर आकाश दहियेकर (वय-१७) रा. जाखनी नगर, कंजरवाडा जळगाव हा पांडे चौकात १९ मार्च रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास पोस्ट ऑफीससमोर मित्रासोबत बोलत होता. त्याच वेळी अंदाजे २२-२३ वयाचा अज्ञात व्यक्ती हाता लोखंडी पट्टी घेवून डोक्यावर मारली. काही कळण्याच्या आत सागर खाली पडला. तसेच पायाच्या घोट्याजवळ मारहाण केली. याप्रसंगी पोलीसांची गाडी जात असतांना त्यांनी मदत करत सागरला तातडीने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान सागरच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version