Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातील परमीट रूम फोडले; एक लाख ७५ हजारांची मद्य लांबविले

जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनमुळे मद्यविक्रीस बंदी असल्याने परमीट रूम बंद ठेवण्याचे आदेश आहे. त्यामुळे बंदावस्थेत असलेले परमीट रूम हॉटेल अज्ञातांनी फोडून दुकानातील १ लाख ७५ हजाराची देशी विदेशी दारू लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, चंद्रकांत खुशीराम अडवाणी (वय-६८) रा. एलआयसी कॉलनी यांचे रेल्वे स्टेशन रोडवर पुनम हॉटेल असून तेथे परमीटची सोय आहे. कोरोनामुळे २१ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर राज्यात दारू विक्रीस बंदी करण्यात आली होती. तेव्हापासून पुनम हॉटेल बंद होते. १२ जुन रोजी लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्यानंतर सुरू करण्यासाठी हॉटेल उघडले असता परमीट रूम मध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. सकाळी ११ वाजता हॉटेलात प्रवेश केलयानंतर त्यांना एक्झास पंखा काढून किचनमध्ये ठेवलेला दिसला. तसचे किचनमध्ये दारू पिलेल्या खाली बाटल्या व ग्लास आढळून आले. चंद्रकांत अडवाणी यांनी हॉटेलमधील गोडावूनची पाहणी केली असता गोडावूनचे कुलूप तोडलेले आढळून दारूचे खाली खोके मिळून आले होते. अज्ञात चोरट्यांनी ३ हजार रूपयांची रोकड व १ लाख ७४ हजार ८२० रूपये किंमतीची देशी-विदेशी दारू लांबविल्याचे लक्षात आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Exit mobile version