Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातील नीलम वाईन्सचा परवाना रद्द

जळगाव प्रतिनिधी । शहराच्या मध्यवर्ती भागात असणार्‍या व आमदार राजूमामा भोळे यांच्या कुटुंबियांची मालकी असणार्‍या नीलम वाईन्स या दुकानाचा परवाना आज रद्द करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

निलम वाईन्ससह जिल्ह्यातील काही वाईन शॉप्स आणि होलसेल ट्रेडर्सची काही दिवसांपूर्वी सखोल चौकशी करण्यात आली होती. यातआमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी माजी महापौर सीमा भोळे यांच्या नावावर असलेल्या पोलन पेठेतील नीलमवाईन्सचा परवाना गुरुवारी कायमस्वरूपी रद्द करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी ही कारवाई केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या आठवड्यात माजी महापौर सीमा भोळे यांच्या नावावर असलेल्या नवी पेठेतील नीलम वाईन्स, नशिराबाद येथील रामा ट्रेडर्स, विजय सेल्स, गुजराल पेट्रोल पंपाजवळील एन.एन.वाईन्स, बांभोरी येथील विनोद वाईन्स व पाळधी येथील सोनी ट्रेडर्स या सहा दुकानांची तपासणी केली होती. त्यात या सहाही दुकानांमधील मद्यसाठ्यात तफावत आढळून आली होती व रेकॉर्डही अद्ययावत नव्हते. याबाबत अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सर्व दुकानांवर विसंगतीचे गुन्हे नोंदवून पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकाजयांकडे प्रस्ताव पाठविला होता.

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये अवैध दारू विक्री होत असल्याची तक्रार करून याचा पाठपुरावा माहिती अधिकार अ‍ॅक्टीव्हीस्ट दीपक गुप्ता यांनी केलेला आहे. त्यांनी या संदर्भात ४ एप्रिल रोजीच पहिली तक्रार केली होती. काही दिवसांपूर्वी पडलेले छापे देखील या तक्रारीतूनच टाकण्यात आले होते. त्यांनी केलेल्या पाठपुराव्याने आज नीलम वाईन्सचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला आहे.

राष्टवादी कॉँग्रेसचे महानगर सचिव अ‍ॅड.कुणाल पवार व युवक अध्यक्ष स्वप्नील नेमाडे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री दिलीप वळसे पाटील, आयुक्त कांतीलाल उमाप तसेच विभागीय आयुक्त अ.ना.ओहोळ यांच्याकडे ईमेलद्वारे लेखी तक्रार केली.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version