जळगावातील दुसरा खूनही झाला अनैतिक संबंधातूनच !

*जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज – प्रतिनिधी |*  – जळगाव शहरात एकच दिवसात दोन खून झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडालेली असतानाच आधीच्या खुना प्रमाणेच आजच्या दुसऱ्या खुनातही अनैतिक संबंध कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

शहरात शनिवारी शिवाजीनगर हुडको परिसरात सज्जनगड या इमारतीत दुपारच्या सुमारास एका २८ ते ३० वर्षीय नरेश आनंदा सोनवणे नामक युवकाची हत्येची घटना घडली. या घटनेतील मारेकरी फरार झाला आहे. येथील रहिवासी असलेल्या महिलेचा पती बाहेरगावी असून या महिलेचे दोन युवकांसोबत प्रेमसंबंध जुळून आले. यातील एकाने प्रेमपात्राशी दुसऱ्याचे संबंध असल्याचे दिसून आले. त्यातून अनैतिक संबंधातून हि हत्या घडली असल्याची चर्चा परिसरात आहे.

या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक ठाकूरवाड याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करून मृतशरीर शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले असून संशयित गुन्हेगाराच्या तपासासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलीसांनी दिली. शनिवारी सकाळ देखील समतानगर परिसरात अनैतिक संबंधातून युवकाची हत्येची खळबळ उडालेली असताना लगेचच दुसरी हत्येची घटना घडली असून या दोन्ही हत्यामुळे परिसरात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Protected Content