Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातील तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

5evuq9is dead body generic 625x300 28 August 18

जळगाव प्रतिनिधी । दांडेकर नगरातील 35 वर्षीय तरुणाचा अतिमद्य सेवनाने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारदम्यान 11 वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, सोमनाथ भास्कर भदाणे वय 35 रा. दांडेकर नगर, पिंप्राळा या तरुणाला 3 ते 4 महिन्यापासून दारूचे व्यसन होते. आज सकाळी 7 वाजता छातीत दुखत असल्याने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले होते. सकाळी 11 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पाटील यांनी घोषित केले. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास पोहेका इन्द्रेकर करीत आहे.

Exit mobile version