Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातील चोरीच्या दुचाकींची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरात मोटारसायकली चोरून त्याचे स्पेअर पार्ट वेगळे करून विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. सात दुचाक्या हस्तगत केल्या असून तिघांना अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी तिघांना एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरून त्याचे सुटे भागांची परस्पर विक्री करूनन सुरत येथे मौजमजा करण्यासाठी निघालेल्या शाहरूख खान सलिम खान (वय-२०, रा. पाटील चक्की जवळ, सुप्रिम कॉलनी) आणि अमन सैय्यद रशिद (वय-१८, अजिम किराणा दुकानाजवळ, सुप्रिम कॉलनी) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील मु.जे.महाविद्यालयाजवळ आज अटक केली. दोघांनी एकुण ११ दुचाकी चोरल्या असून त्यापैकी ४ दुचाकी तिसरा सहकारी इमराज रमजान पटेल (वय-२१, रा. सुप्रिम कॉलनी) याला विल्हेवाट लावण्यासाठी दिल्या होत्या, त्यालाही पथकाने अटक केली.

यांनी केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय हिवरकर, राजेश मेढे, रवि नवाडे, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, अविनाश देवरे, महेश महाजन यांनी कारवाई केली.

Exit mobile version