Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातील इकरा शाहीन कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाही कायम राखली यशाची परंपरा

जळगाव प्रतिनिधी । येथील इकरा शाहीन कनिष्ठ महाविद्यालयाने दरवर्षीप्रामाणे यंदाही यशाची परंपरा कायम ठेवत बारावीच्या परिक्षेचा ९९.०९ टक्केर निकाल लागला आहे.

शाळेत एकुण विद्यार्थी २२२ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी २२० विद्यार्थी परिक्षेत उत्तीर्ण झाली आहे. निकालात शेख शमा फातिमा अन्सार 85.53 टक्के, दू‌सरा क्रमांक खान अल्मास शफीक 84.61 टक्के, तीसरा डानिया हैदर अली 84.46 टक्के, चौथ्या क्रमांकावर पटेल महवाश यूसुफ 84.30 टक्के तर पाचव्या क्रमांकावर शर्मिन सबा आसिफला 83.23 टक्के मिळाला. या यशासाठी सर्व यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांना डॉ. अब्दुल करीम सालार साहब, अल्हाज अब्दुल गफ्फार मलिक साहब, डॉ. ताहिर साहिब, प्राचार्य शेख गुलाब सर आणि प्रभारी झाकीर बशीर सर यांनी अभिनंदन केले.

Exit mobile version