Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावच्या पूर्व भागात वाढतेय राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसेंची ताकद

 

रावेर प्रतिनिधी । जिल्हात सर्वाधिक राजकीयदृष्ट्या चर्चेला जाणा-या रोहिणी खडसे ह्या राष्ट्रवादीच्या युवा महीला नेत्या ज्यांच्यासाठी पक्षाच्या प्रदेशध्यक्षांना मुक्ताईनगर मतदारसंघात येऊन २०२४ मध्ये व्याजासकट निवडणुकीची नुकसान भरपाई करून देण्याची हमी द्यावी लागली.

गेल्या विधानसभा निवडणुकीत थोड्यामताने पराभूत होऊन देखिल सतत चर्चेत राहणा-या रोहिणी खडसेंची नाथाभाऊच्यां माध्यमातुन जळगावच्या पूर्व भागात त्यांची कमालीची ताकद वाढत चालली आहे. त्यामुळे येत्या काही काळात राजकारणात प्रचंड बदल या भागात दिसायला मिळणार आहे. 

माजी मंत्री एकनाथराव खडसे भाजपा सोडल्या नंतर त्यांच्या सोबत त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनी देखिल राष्ट्रवादीत प्रवेश केला. एलएलबीचे शिक्षण झालेल्या रोहिणी खडसेंमध्ये नाथाभाऊची छबी दिसते. रोहिणी खडसे यांचा वैयक्तिक मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघा प्रमाणे रावेर-यावल,व मलकापुर मतदारसंघावर देखिल प्रभाव आहे. रोहिणी खडसे रावेर लोकसभेच्या केळी पट्यात नेहमी सक्रीय असतात. महिलांचे कार्यक्रम असो की हळदी-कुंकूचे कार्यक्रम त्या कार्यकत्याच्या संपर्क असतात. नेहमी नविन आमदार निवडून देणाऱ्या रावेर-यावल विधानसभेत देखिल रोहिणी खडसेचा प्रचंड प्रभाव आहे. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नावाची चर्चा रावेर मधुन देखिल होती. जिल्हा बँकच्या अध्यक्षा असलेल्या रोहिणी खडसे सद्या नाथाभाऊ प्रमाणे थेट ग्राउंडवर कार्यकर्त्यांच्या संर्पकात असतात. यावर्ष भरात बऱ्याच संस्थाच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. या माध्यमातून रोहिणी खडसे देखिल राष्ट्रवादीला जास्तीत-जास्त जागा कश्या मिळतील यासाठी प्रर्यत्नशिल असणार आहे. जिल्हात राष्ट्रवादीच्या ताकदवर युवा महीला राजकीय नेत्या म्हणून रोहिणी खडसेंची ताकद जळगावच्या पूर्व भागात वाढत चालली आहे.

 

Exit mobile version