Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावच्या कोरोनामुक्त रूग्णाला उद्या मिळणार डिसचार्ज !

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील पहिला कोरोना पॉझिटीव्ह ठरलेला रूग्ण या व्याधीवर मात करून बरा झाला असून त्याला उद्या डिसचार्ज देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

याबाबत वृत्त असे की, जळगाव जिल्ह्यात आढळून आलेल्या पहिल्या कोरोना बाधित रूग्णाचा १५ दिवसानंतर घेण्यात आलेला दुसरा नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे या रूग्णास उद्या म्हणजेच १५ एप्रिल रोजी कोविड १९ रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. आतापर्यंत प्राप्त झालेल्या सर्व तपासणी अहवालानुसार सध्या जळगाव जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रूग्ण नाही. ही अतिशय महत्वाची व दिलासादायक घटना असल्याची प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा व आरोग्य यंत्रणेच्या अथक मेहनतीबरोबरच जिल्ह्यातील सर्व माध्यम प्रतिनिधींनी नागरिकांमध्ये केलेल्या जनजागृतीचे व नागरिकांच्या सहकार्याचे हे फळ असल्याचे ते म्हणाले. तर, यापुढील लॉकडाऊनच्या काळातही नागरिकांनी संयम राखून घरातच रहावे. व आपला जिल्हा कोरोना मुक्त राहण्यासाठी आपले बहुमुल्य योगदान द्यावे. असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version