जळगावच्या कुलगुरूंची निवड नवीन कायद्यानुसार करा : राष्ट्रवादीची मागणी

जळगाव, प्रतिनिधी ।  कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये  नवीन कुलगुरू यांची निवड नव्या विद्यापीठ कायद्यानुसार करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस सचिव  अॅड. कुणाल पवार, भूषण भदाणे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस अध्यक्ष अक्षय वंजारी, उपाध्यक्ष चेतन चौधरी यांनी ईमेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली  आहे.    

 

ईमेलचा आशय असा की,  कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये आगामी कुलगुरू  यांची निवड प्रक्रिया सुरू करायच्या आपण तयारीत आहोत. आपल्या विद्यापीठ कायद्यात सुधारणा करणेसाठी सूचना जाल्या होत्या त्याप्रमाणे त्यांची  अंमलबजावणी होऊन नवी कुलगुरू निवड ही नव्या विद्यापीठ कायद्याप्रमाणे करावी. कारण कोण्या एका विचारसरणीचा पगडा त्या विद्यापीठमध्ये पडणार नाही. त्याचप्रमाणे तेथे चुकीचे ठराव सीनेट मध्ये मंजूर करून आर्थिक भ्रष्टाचाराला आळा बसेल तसेच विद्यापीठात परीक्षा प्रशासन, रोजंदारी कर्मचारी यांची कामे  सुरळीतपणे पार पडतील. आपण निवड केलेल्या समितीमध्ये  प्रधान सचिव ओमप्रकाश  गुप्ता यांचे नाव आहे. परंतु, त्याना मागील काळात विद्यापीठ प्रशासन व भ्रष्टाचार विषयी वेळोवेळी तक्रार केल्या त्याबाबत चौकशी करण्यात येईल व त्या तक्रारी सचिव गुप्ता यांचेकडे दिले असल्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कडून email प्राप्त झाले होते व आहेत. परंतु, एका प्रकरणात देखील त्यानी चौकशी केली नाही म्हणून कुठ तरी काही तरी चुकल्यासारखा वाटत आहे म्हणून विनंती की आपण नवीन कुलगुरू निवड ही नव्या कायद्यानुसार करावी.

Protected Content