Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावचा सुपुत्र मुकेश कुरील संविधानाचा प्रचार प्रसार करत दिल्लीत डेरेदाखल

जळगाव, प्रतिनिधी | संविधान साक्षरता अभियान अंतर्गत जळगाव शहरातील कार्यकर्ते मुकेश राजेश कुरील संविधानाचा प्रचार प्रसार करत २२ नोव्हेंबर रोजी दिल्लीत डेरेदाखल झालेत.

 

मुकेश राजेश कुरील यांचा दिल्ली पर्यंतचा प्रवास ५ नोव्हेंबर या दिवशी जळगाव येथुन सुरु झाला होता. संविधान साक्षरता अभियान अंतर्गत सर्वांनी संविधान वाचाव आणि आत्मसात कराव असा संदेश ते करीत आहे. २३ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे पोहचण्याचा कुरील यांचा संकल्प होता. परंतु, मुकेश हे स्वत : शीच शर्यंत करत २२ रोजीच त्यांनी दिल्ली गाठली आहे. कुरील यांनी जवळपास १७०० किमी.चा प्रवास करत दिल्लीला पोहाचले आहेत. जळगाव, बुरहानपुर, आष्टा, भोपाल, विदीशा, सागर, हिरापुर, छत्तरपुर, महोबा, कानपुर, लखनौ, शहाजहाँपुर, मुरादाबाद, हापुर असा प्रवास करत त्यांनी दिल्ली गाठली. मुकेश हे जळगांव ते दिल्ली सायकलीने १८ दिवसात पोहोचले आहेत. त्यांनी या प्रवासादरम्यान संविधानाचा जागर , प्रचार प्रसार करत दिल्ली गाठली. दिल्ली येथे त्यांनी अगोदर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाण स्थळी जाऊन महामानवांना अभिवादन केले. मुकेश कुरील हे आता सलग चार दिवस राजधानी दिल्ली येथे संविधानाचा प्रचार प्रसार करणार आहेत. कुरील यांनी राष्ट्रपती भवन कार्यालयात राष्ट्रपती महोदय यांना भेटण्यासाठी ई- मेल द्वारे विनंती केलेली आहे. २६ नोव्हेंबर हा संविधान दिन असल्याने त्या दिवशी राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्याचा त्यांचा मानस आहे.

Exit mobile version