Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भूमीगत गटारीच्या चेंबरच्या लोड टेस्टला सुरवात; महापौरांनी केली पाहणी

जळगाव प्रतिनिधी । शहरात भूमीगत गटारींचे काम सुरू असून ठिकठिकाणी चेंबर तयार करण्यात आले आहे. भूमीगत गटारींच्या चेंबरचे काम योग्य नसून अनेक गैरसमज नागरिकांच्या मनात आहे. नागरिकांचे गैरसमज दूर करण्यासाठी बुधवारपासून चेंबरची लोड टेस्ट सुरू करण्यात आली. महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या उपस्थितीत चेंबरवर १७ टन वजनाचा भार तपासून पाहण्यात आला.

लोड टेस्टला कानळदा रस्त्यापासून सुरुवात करण्यात आली. यावेळी महापौर सौ.भारती सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, शहर अभियंता अरविंद भोसले, योगेश बोरोले, भूमीगत गटारीच्या कामाचे मक्तेदार प्रतिनिधी आणि अभियंता उपस्थित होते 

नागरिकांच्या मनात अनेक शंका, संभ्रम

भूमीगत गटारींच्या कामाबाबत जळगावकर नागरिकांच्या मनात अनेक शंका आणि संभ्रम आहे. चेंबरवर पाणी न मारणे, वीट न भिजवता वापरणे, पाणी न मारणे, प्लास्टर न करणे, सिमेंट, वाळू कमी जास्त असणे, चेंबरचे झाकण, रिंग कमकुवत आहे अशा अनेक शंका आणि संभ्रम नागरिकांच्या मनात आहे.

चेंबरने पेलली १७ टन क्षमता

भूमीगत गटारीसाठी गल्लोगल्ली चेंबर तयार करण्यात आले आहे. गल्लीतून शक्यतो अवजड वाहने जात नाही. तरीही चेंबरने १७ टन क्षमतेचा भार पेलला आहे. १७ टन क्षमता म्हण्जेज चेंबरहून ६८ टन वजनाचे वाहन जाऊ शकते. आजपर्यंत १० चेंबरची तपासणी पूर्ण झाली असून दररोज ५ चेंबर तपासले जाणार आहे.

Exit mobile version