Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळके येथे एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील जळके गावातील बसस्थानकाजवळ स्टेट बँकेचे एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून ते मशिन फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे आज सकाळी उघडकीला आले. चोरट्यांचा प्रयत्न असफल त्यांना रिकाम्या हाती परतले. याप्रकरणी पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.

 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील जळके गावातील वावडदा रस्त्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीमएम आहे. शनिवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास या एटीएम मशिनच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यावेळी त्यांनी एटीएममध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडले आणि एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, चोरट्यांकडून एटीएम मशिन न फुटल्याने एटीएम मशिनमधील कॅश सुरक्षीत राहिली असून चोरटयांचा प्रयत्न फसला. एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आज सकाळी स्टेट बँकेचे व्यवस्थापक दीपक तिवारी यांनी एटीएमची पाहणी केली. यावेळी त्यांनी एटीएम मशिनचे कुठलेही नुकसान झाले नसल्याने त्यांनी तक्रार देणार नसल्याचे सांगितले.

 

Exit mobile version