Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जल सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन- चौधरी

रावेर प्रतिनिधी । जलसंपदाच्या पाटबंधारे विभाग येणार्‍या दि १६ ते दि २२ मार्चच्या दरम्यान जल सप्ताह साजरा करणार येत असून याच्या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहीती उपविभागीय अभियंता शशिकांत चौधरी यांनी दिली आहे.

या जल सप्ताहामध्ये पाण्याचे नियोजन, पाणी वापरणे,नैसर्गिक जलस्त्रोत,पाण्या वरील प्रदुषण रोखणे,पाण्यासंबंधी नियमांचे पालन,पाणी वाटप संस्था,विविध शाळांमध्ये, शेतकर्‍यां मध्ये गावांमध्ये जनतेत पाण्या बाबत जन-जागृती करण्यात येणार आहे. दरम्यान, जागतीक जलदिन सप्ताह निमित्त जन-जागृती करून पाण्याचे महत्व पटवुन दिल्या नंतर पाटबंधारे विभागाच्या या उपक्रमाचा आमदार शिरिषदादा चौधरी यांच्या हस्ते मोर धरणावर जलपूजन करून समारोप करण्यात येणार आहे. त्यांनी देखिल शेतकरी व गावकर्‍यांना पाण्याचे नियोजन करून वापर करण्याचे आवाहन केले आहे. तर जलसप्ताह निमित्त पाट बंधाराचे कार्यकारी अभियंता श्री शिंदे यांनी बैठक घेऊन पाण्या बाबत प्रभावी पणे जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहे.शेती,गावात,पाण्याचे नियोजन करावे लघु व मध्यम प्रकल्पाच्या पाण्यावर प्रदूषण करू नका प्रत्येकाने १० टक्के पाणी बचत करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

Exit mobile version