Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव खु॥ येथील विकास विद्यालयात ‘कृषी शिक्षण दिवस’ उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । शहरातील डॉ. उल्हास पाटील कृषी अभियंत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विकास विद्यालय, जळगाव खु. येथे आज (दि.३ डिसेंबर) रोजी भारतरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा वाढदिवस कृषी शिक्षण दिन म्हणून साजरा केला.

यावेळी प्रा. एन. डी. पाटील रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी यांनी तेथील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची माहिती दिली. त्यांनतर प्रा. प्रशांत डिक्कर, कृषी यंत्र विभाग कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव यांनी विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाचे महत्व पटवून देत असतांना असे सांगितले की, कृषी शिक्षण म्हटले, की आपणास आधुनिक तंत्रज्ञान शेती नव-नवीन पिकांचे अधिक व दर्जेदार उत्पन्न देणारे वाण, आधुनिक सिंचन पद्धती, संरक्षित शेती म्हणजे पॉलिहाऊस, ग्रीन हाउस व शेडनेटमधील शेती, यांत्रिक शेती, फळे व भाजीपाला उत्पादन व यावर प्रक्रिया तंत्र, निर्यातक्षम शेती इत्यादी गोष्टी डोळ्यासमोर येतात.

परंतु, यासाठी कुशल मनुष्यबळ, शास्त्रज्ञ/ प्राध्यापक व क्षेत्रीय कृषी अधिकारी/ कर्मचारी यांची गरज लागणारच व त्यांचा सहभाग, योगदान मोलाचे असणार आहे. शेतकरी तसेच बदलत्या परिस्थितीत शास्त्राची कास धरणारा प्रगतिशील शेतकरी ही कृषी व्यवसायाचा कणा आहे. या सर्वांच्या सहभागातूनच आपला देश कृषी व्यवसायामध्ये सक्षम, स्वयंपूर्ण व समृद्ध होणार आहे. मृदा व जल संधारण विभागाचे प्रा. संदिप पाउलझगड यांनी आभार मानले. त्यावेळी विकास महाविद्यालयाचे प्रा. चंद्रकांत पाटील शिक्षकेतर कर्मचारी प्रविण महाजन, प्रविण पाटील व सर्व नववी व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.

 

 

 

Exit mobile version