Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जरंडेश्वर कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या- किरीट सोमय्या

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणात न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाकडून जप्त करण्यात आलेल्या संपत्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे .

कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर काही वर्षांपूर्वी लिलावातून विक्री झाली. सध्या हा कारखाना विक्री नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या खासगी मालकीचा असून सध्या तो ‘जरंडेश्वर शुगर्स’ नावाने चालविला जात आहे. लिलावाच्या वेळी मूल्यांकनापेक्षा कमी रकमेत कारखान्याची विक्री झाल्याचा आरोप कारखान्याच्या संस्थापक अध्यक्षा डॉ शालिनीताई पाटील यांनी केला होता. या प्रकरणी न्यायालयात गेल्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार जरंडेश्वर कारखान्याच्या खरेदी विक्री व्यवहाराची ‘ईडी’ मार्फत चौकशी सुरू करण्यात आली. ईडीने या कारखान्याला सील ठोकून त्याच्याशीसंबंधित १२०० कोटींची संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या व्यवहारासंबंधीची कागदपत्रे २१ ऑक्टोबर २०२१ मधेच ईडीसमोर सादर करण्यात आली होती. ही कागदपत्रे सादर करताना सोमय्यां समवेत कारखान्याचे तत्कालीन पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. या प्रकरणामध्ये आता न्यायालयाकडून संबंधित कारखान्याची संपत्ती जप्त करण्याचा ईडीच्या कारवाईला मान्यता देण्यात आली आहे.

अजित पवार यांनी केलेला १२०० कोटींचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना घोटाळा सिद्ध झाला असून ईडीने या कारखान्याची प्रॉपर्टी अटॅच केली होती. ती ईडी मार्फत जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाने यास मान्यता दिली केंद्र सरकार आणि सक्त वसुली संचालनालयाला विनंती केली आहे. यात कारखाना पुन्हा २७ हजार शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा, असेही भाजपचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

Exit mobile version