Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जया बच्चन यांना कंगनाचे प्रत्युत्तर

मुंबई : वृत्तसंस्था / अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूचा सध्या तपास सुरु आहे. या तपासा दरम्यान, कलाविश्वातील ड्रग्स पार्टी हा नवा मुद्दा चर्चेत आला असून अभिनेत्री कंगना रणौतने याविषयी भाष्य केलं आहे. मात्र अनेकांनी कंगनावर निशाणा साधला असून समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनीदेखील कंगनाला टोला लगावला आहे. मात्र आता कंगनाने जया बच्चन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“जयाजी, माझ्या जागी तुमच्या मुलीला श्वेताला जर किशोरवयात कोणी मारहाण केली असती, तिला ड्रग्स दिले असते आणि तिच्यासोबत गैरवर्तणूक केली असती, तर तेव्हादेखील तुम्ही असंच म्हणाला असतात का? तसंच अभिषेक सातत्याने छळ व गुंडगिरीचा त्रास होतोय अशी तक्रार करत असेल आणि एक दिवस तो अचानक फासावर लटक्याचं दिसून आला तर ? आमच्यासाठी सुद्धा कधीतरी प्रेमाने हात जोडण्याचा प्रयत्न करा”, असं ट्विट कंगनाने केलं आहे. सोबतच तिने जया बच्चन यांचा सभागृहातील व्हिडीओदेखील शेअर केला आहे.

Exit mobile version