Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जयपूरमध्ये बाबा रामदेव बाबांसह चौघांविरुद्ध गुन्हा !

जयपूर (वृत्तसंस्था) योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ने बनवलेले कोरोनिल औषध वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या औषधावरुन आता जयपूरमध्ये बाबा रामदेव, पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण आणि अन्य चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

कोरोनिल औषधाच्या सेवनामुळे रुग्ण कोरोना व्हायरसमधून पूर्णपणे बरा होतो हा बाबा रामदेव यांचा प्रचार पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. जयपूरच्या ज्योति नगर पोलीस ठाण्यात बाबा रामदेव, पतंजली आयुर्वेदचे एमडी आचार्य बालकृष्ण, शास्त्रज्ञ अनुराग, एनआयएमएसचे चेअरमन बलबीर सिंह तोमर आणि संचालक अनुराग तोमर यांच्याविरोधात कोरोनिल औषधावरुन दिशाभूल करणारा प्रचार केल्याबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी आम्ही वैद्यकीय चाचणीपूर्वी करोनिल गोळ्यांना कधीही वैद्यकीय रित्या आणि कायदेशीररित्या कोरोनाचे औषध म्हटले नाही, असे पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी स्पष्टीकरण दिले होते.

Exit mobile version