Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जम्मू विमानतळावर ड्रोनच्या सहाय्याने स्फोट

श्रीनगर : वृत्तसंस्था । जम्मू विमानतळ दोन स्फोटांनी हादरलं आहे. भारतीय हवाई दलाच्या तांत्रिक विभागात हे दोन स्फोट झाले आहेत. कडक सुरक्षाव्यवस्था असतानाही झालेल्या या स्फोटांमुळे चिंता व्यक्त होत आहे. 

 

स्फोटात कोणीही जखमी किंवा कोणतंही नुकसान झालं नसल्याचं भारतीय हवाई दलाकडून सांगण्यात आलं आहे. ड्रोनच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला असून दहशतवादी हल्ला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेला नाही.

 

रविवारी पाच मिनिटांच्या अंतरावर हे दोन स्फोट झाले आहेत. रात्री १ वाजून ३७ मिनिटांनी पहिला तर १ वाजून ४२ मिनिटांनी दुसरा स्फोट झाला. स्फोटामध्ये इमारतीचं छपराचा भाग कोसळला आहे.  ड्रोनच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला असून यासाठी स्फोटक उपकरणाची मदत घेण्यात आली.

 

 

भारतीय हवाई दलाने ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार, “रविवारी सकाळी जम्मू एअर फोर्स स्टेशनमध्ये दोन कमी तीव्रतेचे स्फोट झाले. एकामुळे इमारतीच्या छताचं नुकसान झालं असून दुसरा मोकळ्या परिसरात पडला. स्फोटात कोणतंही नुकसान झालेलं नाही.  स्थानिक यंत्रणांसोबत तपास सुरु आहे”.

 

 

स्फोटांनंतर काही वेळातच संपूर्ण परिसर सील करण्यात आला. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम सध्या घटनास्थळी असून स्फोटांचं मुख्य कारण शोधत आहेत. एनसजी आणि एनआयएची टीमदेखील घटनास्थळी पोहोचत आहे. स्फोटांची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.

 

Exit mobile version