Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जम्मू बस स्थानकावरून स्फोटके जप्त; घातपाताचा कट उधळला

जम्मू वृत्तसंस्था । जम्मू बस स्थानकावरून तब्बल सात किलो इतकी स्फोटके जप्त करण्यात आली असून याच्या मदतीने मोठा घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न उधळून लावण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे.

आज जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळण्यात जम्मू-काश्मीर पोलिसांना यश आलं आहे. जम्मू बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयितालाही अटक केली आहे.

शनिवारी अनंतनाग पोलिसांनी सांबा परिसरातून दर रजिस्टंट फ्रन्टचा दहशतवादी जहूर अहमद राठेर याला अटक केली आहे. राठेरवर भाजपचे 3 कार्यकर्ते आणि एका पोलिस कर्मचाऱ्याच्या हत्येचा आरोप आहे. राठेरने दहशतवादाचं प्रशिक्षण घेतलं होतं आणि राजौरी परिसरातून घुसखोरी करुन तो भारतात दाखल झाला होता

Exit mobile version