Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जम्मू-काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचा जवान शहीद ; स्थानिक मुलाचाही मृत्यू

श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. तर तीन जवान जखमी झाले असून एका स्थानिक मुलाचा देखील मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

 

दहशतवादी दुचाकीवरुन आले होते. यावेळी त्यांनी सीआरपीएफच्या गस्त पथकावर गोळीबार केला. सीआरपीएफने दिलेल्या माहितीनुसार, जवानांना राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षेसाठी पाठवण्यात आले होते. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान आणि १२ वर्षाचा मुलगा जखमी झाला होता. दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत त्यांचे निधन झाले. दरम्यान, सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये बिजबेहरा येथे चकमक सुरू आहे.

Exit mobile version