Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जप्तीचे वजन काटे चोरणाऱ्यांवर शहर पोलिसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । अतिक्रमण विभागाने जप्त केलेल्या वजन काटे चोरणाऱ्यांना रंगेहात पकडून शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून अतिक्रमणाची मोहिम राबविली जात आहे. या दरम्यान काही बेशिस्त हॉकर्सचे साहित्य अमिक्रमण विभागाच्या पथकाने जप्त केले असून ते मनपाच्या आवारात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, गुरूवारी दुपारच्या सुमारास कमलेश भगवान महाजन (रा. रामायण मंदिर, धरणगाव) व गोपाल भिका सोनवणे (रा. मोठा माळीवाडा ता. धरणगाव) हे दोघं जप्त केलेल्या साहित्यातून वजनकाटा घेवून जात असताना मनपाच्या पार्कींगमध्ये असलेल्या सुरक्षा रक्षकाला दिसून आले. त्यानी दोघांची विचापुस करुन तात्काळ उपायुक्त संतोष वाहुळे यांच्याकडे घेवून गेले. यावेळी उपायुक्तांनी दोघांवर पोलिस ठाण्यात कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. मनपाच्या पार्कींगमधून हजार रुपये किमतीचा वजनकाटा चोरणाऱ्‍या दोघांविरुद्ध मनोज नामदेव दुसाने यांच्या फियार्दीवरुन शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version