जनतेने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे — आमदार गिरीश महाजन (व्हिडिओ)

शेंदूर्णी,  विलास पाटील ।  येथील नगरपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे कोरोना प्रतिबंध लसीकरण शिबिराचा शुभारंभ आ. गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. 

 

पारस जैन मंगल कार्यालयात आयोजित कोरोना व्हायरस प्रतिबंध लसीकरण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी शेंदूर्णी नगरपंचायत लोकनियुक्त नगराध्यक्षा  विजया खलसे, उपनगराध्यक्षा  चंदाबाई अग्रवाल, गटनेत्या रंजना धुमाळ, नगरसेविका साधना बारी, ज्योती गायकवाड, नगरसेवक शरद बारी, राहुल धनगर, निलेश थोरात, गणेश जोहरे, अलीम तडवी,भाजपचे जेष्ठ नेते गोविंद अग्रवाल, पारस पतसंस्था चेअरमन प्रकाश झंवर, पं. दीनदयाळ पतसंस्था चेअरमन अमृत खलसे, आरोग्य दूत अरविंद देशमुख, स्वीकृत नगरसेवक प्रफुल्ल पाटील, अॅड धर्मराज सूर्यवंशी ,नगरपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य अधिकारी शुभम सावळे,व सर्व कर्मचारी भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कोरोना वॅक्सिंन लसीकरण करून घेण्यासाठी जेष्ठ नागरिक,युवक व महिलांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. शिबिरात नागरिकांसाठी २ हजार कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यावेळी नगरपंचायत कर्मचारी, आशा सेविका, पतसंस्था कर्मचारी यांनी स्वयंसेवक म्हणून नागरिकांना लसीकरण करून घेण्यासाठी मदत केली.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/169151915350380

Protected Content