Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जनआंदोलन खानदेश विभागाच्या वतीने पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात देशातील नागरिकांवर असंवैधानिक भाषेत टीका केल्याने त्यांचा जनआंदोलन खानदेश विभागाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

 

पत्राचा आशय असा की,  राष्ट्रपतींच्या अभिभाषणात आभार प्रस्तावाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास कॉंग्रेस पक्षाला जबाबदार धरले आहे. हा लॉक डाऊन काळात परप्रांतीय बांधवांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी मदत करणाऱ्या देशभरातील नागरिकांचा अपमान केला आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी कोणतीही उपाययोजना न करता २३ फेब्रुवारी २०२० रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गुजरातेत देश-विदेशातील लाखो लोकांच्या उपस्थितीत प्रचार केला. मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. कोरोनाच्या महामारीतून देश बाहेर पडत आहे. राज्य आर्थिक अडचणीत आहेत. नवीन नोकरी तरुणांना नाहीत आणि बेरोजगारी वाढत आहे. शिक्षणाचा बट्ट्याबोळ यांच्या धोरणांमुळे झाला आहे .शेतकऱ्यांना एमएसपी देण्यास टाळाटाळ करीत आहेत. असे विविध मूलभूत प्रश्न त्याचप्रमाणे नोटा बंदीमुळे आर्थिक मंदी यासारख्या मागच्या काळात रुग्णांना मदत होईल त्यासाठी हॉस्पिटल, विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ असे कोणतेही कार्य न करता या आणि या आणि अशा अनेक समस्या असताना या गंभीर मुद्द्यांवर चर्चा न करता कोरोना विषाणूचा समस्या असताना त्यात गंभीर चर्चा न करता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोरोना विषाणूचा फैलाव काँग्रेस पक्षामुळे झाला असे बेजबाबदार विधान करून कोरोनाच्या या कठीण काळात परप्रांतीय बांधवही स्वतःच्या मर्जीने आपापल्या गावी जाण्यासाठी आतुर असल्यामुळे त्यांना मदत करणाऱ्या असंख्य ज्ञात व अज्ञात बांधवांचा व त्यांच्या मदत कार्याचा प्रधान सेवक नरेंद्र मोदी यांनी आपण संस्थेच्या पवित्र मंदिरात उभे राहून अपमान केला आहे. यामागे आरएसएस गटाचा देखील हस्तक्षेप करण्याचा आमचा मानस आहे म्हणून आम्ही प्रधान सेवक संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचा निषेध करीत आहोत. या पत्रावर प्राध्यापक गौतम निकम, शत्रुघ्न नेतकर, विजय मदनलाल शर्मा, योगेश्वर राठोड, सुखदेव पंडित, गुजर आबा, नासिर भाई शेख, मिलिंद भालेराव, गणेश भोई, प्रदीप चौधरी, अशोक राठोड, आर. के. माळी ,सागर नागणे, संदीप पाटील आदींची स्वाक्षरी आहे.

Exit mobile version