Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जगात भारतीय मुस्लिमांना देशाचा अभिमान वाटायला हवा — गुलाम नबी आझाद

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चौघांना राज्यसभेत निरोप देण्यात आला. यावेळी आझाद म्हणाले, “मी त्या नशीबवान माणसांपैकी एक आहे, जे कधीही पाकिस्तानात गेले नाहीत. मला भारतीय मुस्लिम असल्याचा अभिमान आहे. जगात  देशाचा अभिमान भारतीय मुस्लिमांना वाटायला हवा .

 

गुलाम नबी आझाद यांनी निरोपाचं भाषण केलं. यावेळी ते  म्हणाले,”माझी नेहमीच अशी भूमिका राहली आहे की, आम्ही नशीबवान आहोत. स्वातंत्र्यानंतर माझा जन्म झाला. पण, आज गुगलवर वाचतो. यू ट्यूबवर बघतो. मी त्या नशीबवान लोकांपैकी आहे जे कधीही पाकिस्तानात गेले नाहीत. पण, जेव्हा मी वाचतो की पाकिस्तानात कशी परिस्थिती आहे. तेव्हा मला अभिमान वाटतो की, मी भारतीय मुसलमान आहे. मी असं म्हणेन की, जगात जर कोणत्या मुस्लिमांना अभिमान वाटायला हवा, तर तो भारतीय मुस्लिमांना वाटायला हवा. मागील ३५ वर्षात अफगाणिस्तानपासून ते इराकपर्यंत आपण बघतोय की, कसे मुस्लिम एकमेकांसोबत लढत संपत चालले आहेत. तिथे तर हिंदू नाहीत. तिथे ख्रिश्चनही नाही. तिथे दुसरं कुणी लढत नाही. ते आपसातच लढत आहेत,”

 

आझाद म्हणाले,”जेव्हा मी जम्मू काश्मीरचा मुख्यमंत्री झालो, तेव्हा पहिली बैठक सोपोरमध्ये घेतली होती. जेथून गिलानी दोन ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी झालेल्या बैठकीत मी म्हणालो होतो की, माझ्या सरकारमधील कोणताही मंत्री धर्म वा मशिद किंवा पक्षाच्या आधारावर न्यायनिवाडा करेल, तर मला लाज वाटेल की, मी या मंत्र्यासोबत काम करतोय,”

Exit mobile version