Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे ज्यांच्याकडे इंटरनेट नाही — राहुल गांधी

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । ट्विटमधून राहुल यांनी लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणीवर आक्षेप घेतला ते म्हणतात, कोरोना लसीकरण केंद्रावर प्रत्येकाला लस मिळावी. ऑनलाईन नोंदणीची आवश्यकता नसावी. जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे ज्यांच्याकडे इंटरनेट नाही.

 

काँग्रेस नेते राहुल गांधी सतत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन केंद्र सरकारवर टीका करत असतात. त्यांच्या ट्विट्सच्या माध्यमातून ते सरकारला प्रश्न विचारत असतात. आजच्या त्यांच्या ट्विटमध्येही त्यांनी सरकारच्या लसीकरणाच्या धोरणावर टीका केली आहे. लस घेण्याचा अधिकार इंटरनेट नसणाऱ्याचाही आहे असं ते म्हणाले.

 

 

काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयानेही लसीकरणासाठीच्या ऑनलाईन नोंदणीच्या आवश्यकतेवर आक्षेप घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, नियोजन करणाऱ्यांना सत्य परिस्थितीची जाणीव असायला हवी.

 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील प्रश्न उपस्थित केला आहे. “एक साधा प्रश्न – जर लस सर्वांसाठी विनामूल्य असेल तर खाजगी रुग्णालयांनी पैसे का घ्यावेत” असा सवाल त्यांनी केला आहे.

 

Exit mobile version