Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवज्योती रॅलीने वेधले लक्ष (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत महिलांच्या शिवज्योती रॅली काढून शिवजयंती महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला.

 

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे जळगाव शहरात गुरुवारी भव्य अशी महिलांची रॅली काढण्यात आली. हातात भगवे झेंडे अन् एकाच पारंपारिक वेशातील अन् डोक्यावर भगवे फेटे असलेल्या रॅलीत सहभागी महिलांनी सर्वांचेच लक्ष वेधले होते. शिवरायांच्या जोरदार घोषणाबाजीने आसमंत उजळून निघाला. या रॅलीत चारशे ते पाचशे महिलांनी सहभाग घेतला. भगवे फेटे, हातात भगवे झेंडे, अंगात लाल रंगाची साडी परिधान केलेल्या महिलांच्या रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांची जय, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय या पध्दतीने शिवरायांचा जयघोष करण्यात आला. जोरदार घोषणांनी परिसर दणाणला होता.

शहरातील सार्वजनीक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शास्त्री टॉवर चौकपासून रॅलीस प्रारंभ झाला. अश्वारूढ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ महिलांच्या शिवज्योती रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्ष शंभू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलच्या आश्वीनी देशमुख, नगरसेवक बंटी जोशी, विनोद देशमुख, मुविकोराज कोल्हे, सविता माळी-कोल्हे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महानगर अध्यक्षा मंगला पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व शिवप्रेमी रॅलीत सहभागी झाले होते. फुले मार्केट येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर मंत्री पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून महिलांच्या शिवज्योती रॅलीला सुरुवात झाली. महापौर जयश्री महाजन यांनी त्यांच्या हातात मशाल धरली होती. त्यावर चौकातून रॅली नेहरू चौकमार्गे रेल्वे स्टेशनवर पोहोचली. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तेथून गोविंदा रिक्षा स्टॉप मार्गे रॅली शिवतीर्थ मैदानावर पोहोचली. याठिकाणि अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन रॅलीचा समारोप झाला.

भाग १

भाग २

भाग ३

भाग ४

भाग ५

Exit mobile version