Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन

रायपूर (वृत्तसंस्था) छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले. ते 74 वर्षांचे होते.

अजित जोगी यांना ९ मे रोजी ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रायपूरमधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतू त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळतच होती. काही दिवस त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. नंतर ते कोमात गेले होते. आज त्यांना पुन्हा ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या मेंदूला रक्तपुरवढा बंद झाला होता. त्यामुळे प्रकृती आणखी ढासळली होती. माजी आयएस अधिकारी असलेले अजित जोगी यांनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. काही वर्षांपूर्वी माओवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यात ते थोडक्यात बचावले होते. त्या अपघातानंतर त्यांना कायम व्हिलचेअरच्या मदतीनेच फिरावे लागत होते.

Exit mobile version