Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चौपदरीकरणाचे निकृष्ट काम : शिवसेनेतर्फे रास्ता रोको आंदोलन (व्हिडिओ)

पारोळा, विकास चौधरी । राष्ट्रीय महामार्ग क्र. ६च्या चौपदरीकरणाचे काम अतिशय संथ गतीने व निकृष्ट दर्ज्याचे सुरु आहे या निकृष्टकामाचे चौकशी करण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेतर्फे आ. चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. परंतु, न्हाईच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

 

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६च्या चौपदरीकरणाचे काम अतिशय संथ गतीने व निकृष्ट दर्ज्याचे सुरु असून सद्यस्थितीत अजंग ते तरसोद ह्या टप्प्यात नव्या व जुन्या दोन्ही महामार्गांवर रस्त्याला खोलवर मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे दिवसाला अनेक अपघात होवून मोठी जिवितहानी होत आहे. खराब रस्त्यावर किंवा काम सुरु असल्याचा बऱ्याच ठिकाणी सूचना फलक अथवा मार्गदर्शन चिन्ह देखील लावलेले नाहीत. त्यामुळे रहदारी करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. म्हणून सदरील कामाला गती मिळावी, रस्त्यावर पडलेले खोलवर खड्ड्यांना तात्काळ उच्च दर्जाच्या कामाने डागडूगी करण्यात यावी, निकृष्ट दर्जाच्या होत असलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी यामागणीसह शिवसेनेतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.  हे आंदोलन आमदार चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वात व पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा शिवसेनेतर्फे दुर्गा पेट्रोल पंपाच्या पुढे(बायपास), राष्ट्रीय महामार्ग क्र. ६, म्हसवे शिवार,येथे करण्यात आलेले आहे. या आंदोलनाने जवळपास एक तास चक्का जाम झाले होते. यावेळी शिवसेनेतर्फे न्हाईच्या मॅनेजर लायजनिंग संपर्क अधिकारी अरुण सोनवणे, न्हाई डेप्युटी मॅनेजर पंकज प्रसाद, अभियंता दिग्विजय पाटील, टीम लीडर प्रदीप मोदी, न्हाई आर. ई. अनुप कुमार श्रीवास्तव, नंदकुमार जोशी, शशिकुमार जोशी या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी २२ मार्च पर्यंत पूर्ण काम करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

 

 

 

Exit mobile version