Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चौकशी अधिकारी अमान्य : राष्ट्रीय दलित पॅंथरचा पुन्हा उपोषणाचा इशारा

भुसावळ प्रतिनिधी    भुसावळ तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय दलित पॅंथरने जिल्हा परिषदे समोर आंदोलन केले होते. यासंदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्रात तक्रारदारांच्या नावाचा उल्लेख नसल्याने व भुसावळ गटविकास अधिकारी  यांची चौकशी अधिकारी नेमणूक मान्य नसल्यामुळे राष्ट्रीय दलित पॅंथरचा पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे. 

 

राष्ट्रीय दलित पॅंथर उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, खंडाळा ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार प्रकरणात २२ जुलै  रोजीच्या पत्रामध्ये मूळ तक्रारदारांची नावे नसून चौकशी कामी हजर राहण्याचा सुद्धा त्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला नाही. तसेच भुसावळ गटविकास अधिकारी यांनी स्वच्छ भारत मिशन योजनेची चौकशी होऊनसुद्धा संबंधितांवर गुन्हे दाखल केले नाहीत. त्यांनी रोजगार हमी योजनेचा खोटा चौकशी अहवाल दिल्यामुळे ते  चौकशी अधिकारी म्हणून आम्हाला मान्य नाहीत.  आपल्या स्तरावरून वरिष्ठ अधिकारी यांचा नेतृत्वात चौकशी समिती गठित करावी. चौकशीकामी तक्रारदारांना हजर राहण्याचे आदेश देऊन खंडाळा ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्ट कारभाराच्या योजनानिहाय १४व्या वित्त आयोग, दलित वस्ती सुधारक,  रोजगार हमी योजना, आणि स्वच्छ भारत मिशन योजनेची चौकशी झालेली आहे. या चौकशीत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यावर गुन्हे दाखल करावेत व उर्वरित योजनांची चौकशी करून संबंधितांवर प्रत्येक तक्रारीचे निवेदनात मागणी केलेल्या कायद्यानुसार संबंधितांवर कारवाई करावी.  स्वच्छ भारत मिशन या योजनेची चौकशी होऊन सुद्धा गट विकास अधिकारी हे गुन्हे दाखल करीत नसल्यामुळे यांची चौकशी नेमणूक अधिकारी म्हणून मान्य नाहीत. आपल्या स्तरावर चौकशी समिती गठीत करून चौकशी करण्यात यावी व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा स्थगित झालेले उपोषण पुन्हा करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.  हे निवेदन  ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद सुरवाडे, शरद सुरवाडे, सुभाष जोहरे व राष्ट्रीय दलित पॅंथरच्या पदाधिकारी यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा प)यांना दिले.

Exit mobile version